SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जयसिंगपूर शहरासाठीची सुधारित 70 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेऊ नयेनवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडेकोल्हापूर: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा दणका; कणेरीवाडी व मोरेवाडीत मोठी कारवाईकोल्हापूर: राजारामपुरीतील जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्तमी अनेक वर्षे शेती करतोय परंतु; कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा चांगला ऊस आयुष्यात पाहिला नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन हिंदी पत्रकारिता दिन: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरवशाली वारसापुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा : शिंदे गटाकडून नवीन शिवसेना जिल्हाप्रमुखांची घोषणा !

schedule17 Aug 22 person by visibility 1797 categoryराजकीय

🟠 सुजित चव्हाण, रवींद्र माने जिल्हाप्रमुख;  राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने यांनी केली घोषणा

 कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुजित रामभाऊ चव्हाण आणि इचरकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या नावाची घोषणा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण यांची निवड झाली. हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघानुसार इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली. खासदार माने आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नियुक्तीची पत्रे दोघांकडे सपू्र्त केली.

सुजित चव्हाण हे यापूर्वी शिवसेना शहर उपप्रमुख होते. आता त्यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी इचरकरंजी नगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच मराठा महासंघाचे ते प्रमुख कार्यकर्ते आहेत.

 शिवसेनेतील फुटी नंतर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणी नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार यापुढे जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि विधानसभा मतदारसंघानुसार पदाधिकाऱ्यांची घोषणा पुढील आठ दिवसात केली जाईल अशी राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सुजित चव्हाण म्हणाले, जिल्हाप्रमुख हे पद मोठे असून एक जबाबदारी म्हणून जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार केली जाईल. 

पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, जयवंत हरुगले, किशोर घाटगे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes