SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रक; दूध संघाची नाहक बदनामी करू नका

schedule04 May 26 person by visibility 479 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासूनच्या गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात गेल्या पाच वर्षातील कामगिरी सर्वोत्तम आहे, असे प्रसिद्धीपत्रक दूध संघाच्या संचालक मंडळाने प्रसिद्धीला दिले आहे. दरम्यान; गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी करू नका, असे आवाहनही या पत्रकात केले आहे.

 

पत्रकात पुढे म्हटले आहे, विद्यमान संचालक मंडळांने पाच वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात प्रतिलिटरला दोन रुपये दूध दरवाढ देण्याचे वचन दिले होते. दरम्यान; म्हैशीच्या दुधाला प्रति लिटरला तब्बल १४ रुपये आणि गाईच्या दुधाला प्रति लिटरला तब्बल १० रुपये दूध दरवाढ दिली आहे. संचालक मंडळाने केलेल्या संकल्पानुसार दैनंदिन संकलन १२ लाख लिटरवरून २० लाख लिटर संकलनाचा टप्पा यशस्वीरित्या गाठला. हा ऐतिहासिक टप्पा म्हणजे सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केलेल्या विश्वासाचे आणि पाठबळाचेच प्रतीक आहे. वार्षिक उलाढाल रू.२५५१ कोटींवरून रू.४१०० कोटींवर पोहचली आहे. अधिकृत भाग भांडवल रु. १०० कोटींवरून रू. २५० कोटींवर पोहोचलेले आहे. गुंतवणूक रू. ३२२ कोटींवरून रू. ५९४ कोटींवर पोहोचलेली आहे. कायम मालमत्ता रू. २३५ कोटींवरून रू. ३३९ कोटींवर पोहोचली आहे.

 

  पत्रकात पुढे म्हटले आहे, बाजारपेठेत गोकुळचे म्हैस दूध प्रसिद्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेता म्हैस दूध संकलनामध्ये वाढ करण्यासाठी "स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर दूधवाढ कृती कार्यक्रम" प्रभावीपणे राबविला. यामुळेच, २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात संघाला यश मिळाले. अंतिम दूध दरफरक वाढवताना म्हशीच्या दूध दरातील फरक दोन रुपये पाच पैशांवरून सव्वा दोन रुपये केला. गाईच्या दूध दरातील फरक एक रुपये पाच पैशावरून सव्वा रूपये केला. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्याला दरवर्षी अकरा कोटी रुपये जादा अदा होतात. दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही वार्षिक रू. ५० कोटींवरून वार्षिक तब्बल रु.१२५ कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. पाच वर्षांपूर्वी वार्षिक रु. २१२८ कोटी रुपयांची दूध विक्री आजमीतिला वार्षिक रू. ३६४१ कोटींवर नेलेली आहे. विशेष म्हणजे सणासुदीला २५ लाख लिटर दूध विक्रीचा टप्पा गाठण्यात संघाला यश मिळालेले आहे. 

     

नवी मुंबईतच वाशीमध्ये संघाच्या या आधीच्या प्रकल्पाशेजारीच स्वमालकीच्या इमारतीसह रु. १९ कोटींची जागा घेतली. त्यावर दुग्धशाळा विस्तारित केली. त्यामुळे पॅकिंगवर होणाऱ्या खर्चामध्ये दरवर्षी रू. १२ कोटींची बचत होते. मुंबई पाठोपाठ पुणे विभागसुद्धा दूध विक्रीसाठी फार मोठी बाजारपेठ ठरत आहे. या विभागातील दररोजची दूध विक्री २ लाख ९० हजार लिटर वरून ५ लाख ६० हजार लिटरवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात येथे दररोज १० लाख लिटर दूधविक्रीला वाव आहे. त्यामुळे पुण्यात संघाच्या स्वमालकीची डेअरी असणे गरजेचे होते. त्या दृष्टीने पारदर्शी निविदा प्रक्रिया राबवून स्वमालकीची इमारत, यंत्रसामुग्रीसह जागा खरेदीकरार केला आहे. यामध्ये संघाच्या खर्चात दरवर्षी रू.२२ ते २५ कोटीहून अधिक बचत होणार आहे. या प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीची परतफेड येत्या चार वर्षातच होईल. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे स्वमालकीच्या १६ एकर जमिनीवर ६.५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या वीजनिर्मितीमुळे गोकुळ दूध संघाची विज बिल खर्चामध्ये दरवर्षी साधारणता ६ कोटी रुपये खर्चाची बचत होत आहे.

गोकुळ दूध संघावरील नोकर भरतीचा आरोप धादांत खोटा व अपुऱ्या माहितीवर असल्याचे स्पष्ट करताना पत्रकात म्हटले आहे, या आधीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत ११३८ नोकर भरती केली होती. विद्यमान संचालक मंडळांने गेल्या पाच वर्षात फक्त ७० तांत्रिक व इतर पदे भरलेली आहेत. आरोप धादांत खोटे.....!

 

 पत्रकात म्हटले आहे....

□ मार्च २०१४ अखेर सभासद संस्थांची संख्या ३३२१ होती. मार्च २०१८ अखेर ही संख्या ३६५९ होती. मार्च २०२१ अखेर ही संख्या ४१९३ होती. दरम्यान; सभासद मतदार पात्रतेच्या अखेरच्या मुदतीपर्यंत म्हणजेच मे २०२३ अखेर ही संख्या ५४७० इतकी होती. यामध्ये मागील संचालक मंडळाच्या काळातील ५३८ संस्था समावेश आहे.

□ नवी मुंबईमध्ये वाशी प्रकल्पा जवळची जागा रू. १५० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. ही जागा प्रत्यक्षात रु. १९ कोटीला खरेदी केली आहे.

□ सीमा भागातील दूध खरेदी २६ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केली जाते. हा आरोप पूर्णतः चुकीचा असून सीमाभागातील गाय दूध उत्पादकांना प्रति लिटरला ३६ रुपये दूधदर अदा केला जातो.

□ दूध पुरवठा नसणाऱ्या संस्था ही सभासद आहेत असा अपप्रचार केला जात आहे प्रत्यक्षात गोकुळचे सभासदत्व एक दिवसाच्या संकलनावर ठरत नाही संस्थेची सभासद म्हणून नोंदणी होणे पूर्वीचे व्यवहार उपनियम आणि कायदेशीर पात्रता यानुसारच निश्चित केले जाते.

□हंगामी अडचण किंवा तात्पुरती घट यावरून संस्था अपात्र ठरत नाहीत.

गोकुळचे कामकाज दबावाखाली केल्याचा आरोप होत आहे प्रत्यक्षात गोकुळ दूध संघाचे कामकाज हे सहकार अधिनियम नियम व प्रशासकीय प्रक्रियेनुसारच चालते.

□ विविध धार्मिक सणासुदींच्या काळात गोकुळ दुधाला उच्चांची मागणी असते. अतिरिक्त संकलन, साठवण, प्रक्रिया व वितरणाचे आगाऊ नियोजन करून उपलब्ध साठा व पूर्व नियोजनानुसार विक्री वाढते. विविध धार्मिक सणासुदींच्या काळात व उपक्रमांसाठी संघाकडून वेळोवेळी गरजेनुसार अधिकृत प्रक्रियेतून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes