SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!, नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाहीपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेपगोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलकप्रकाशशोधक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन: भारतीय विज्ञानाचा देदीप्यमान तारागोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरीफटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीम

जाहिरात

 

दुचाकीस ट्रकची धडक; शिक्षक ठार; १ गंभीर

schedule31 Mar 22 person by visibility 29321 categoryगुन्हे

यवतमाळ : चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने दुचाकी चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रशांत बुरांडे हे शिक्षक ठार झाले असून श्रीकांत उपाध्ये हे गंभीर जखमी झाले आहेत. आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

वणी येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले प्रशांत बुरांडे श्रीकांत उपाध्ये हे कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

आज सकाळी शाळेला जात असताना  प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते. चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने उपाध्ये यांनी ब्रेक मारला. त्यादरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले तसेच श्रीकांत उपाध्ये हे जखमी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes