SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्यविश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतजीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्च पर्यंत करता येणार अर्जकोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशतात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक: दादासाहेब फाळके

जाहिरात

 

घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके

schedule16 Feb 26 person by visibility 79 categoryसामाजिक


🟠 हिंद - दी - चादर  श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
🟠 25 फेब्रुवारी पर्यंत निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठीचे साहित्य पाठवावे

कोल्हापूर : हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर , बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आणि इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी केले.

नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणाऱ्या हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातून सहभाग नोंदविला जाण्यासाठी तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने उपसंचालक श्री टाके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुक बागवान तसेच विविध समाज बांधव उपस्थित होते.

तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. उपसंचालक प्रवीण टाके यांनी ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली.

 तर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजनाबाबत माहिती दिली. या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुल्या व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

 कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव मोठया प्रमाणावर सहभागी होणार असल्याची माहिती लखन पोवार व रतन चव्हाण यांनी दिली. तर कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत वसंत नाईक यांनी माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes