SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्च पर्यंत करता येणार अर्जकोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशतात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक: दादासाहेब फाळकेअखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

schedule16 Feb 26 person by visibility 146 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर यांनी कॅम्पस प्लेसमेंट २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एकूण २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

यामध्ये  फुकोकू इंडिया प्रा. लि., पुणे या कंपनीत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील १३ व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ०७ अशा एकूण २० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांना २.७८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. तसेच बजाज  या नामांकित कंपनीत १ विद्यार्थ्याची निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे प्रभावी नियोजन, विभागप्रमुखांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत कारणीभूत ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल  वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, डिग्री प्राचार्य डी.एन .माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्रा. पी. आर. पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.पी.जे.पाटील,  प्रा. आर. वाय. पोवार, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes