SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्यविश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतजीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्च पर्यंत करता येणार अर्जकोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशतात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक: दादासाहेब फाळके

जाहिरात

 

भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांक

schedule16 Feb 26 person by visibility 160 categoryउद्योग

◼️शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल
◼️किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द  शो ठरला
◼️शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआयमध्ये : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे उदगार
◼️शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे उदगार

कोल्हापूर : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी काढले.
यावेळी बोलताना ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतीच्या विकासासाठी काय करत हे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले असून ज्या पद्धतीने ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी साखर कारखाने ४० वर्षापूर्वी सुरू झाले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठीही वेगवेगळी सुविधा गाव पातळीवर सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

       यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीत त्यामुळे पिकांना याचा फटका बसतो तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचे आहे. अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे याठिकाणी ऊस पिक मोठ्या पद्धतीने घेतले जाते शेतकऱ्यांनी इतरही पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

       यावेळी प्रास्ताविकपर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्याचा ही खरपूस समाचार घेतला.आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याशी इथले स्थानिक नेते काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का याचं त्यांनी जाहीर रित्या उत्तर द्याव असे आव्हान ही खासदार महाडिक यांनी यावेळी दिले. आणि जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत किसान योजना आहे याचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
गेली १८ वर्ष भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. परिपूर्ण असे प्रदर्शन भरविले जात आहे. कृषी प्रदर्शनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती असे सांगितले.
       समारोपप्रसंगी  विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती होती.त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आ.अशोकराव माने,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक  बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची  उपस्थिती होती.यावेळी आभार पृथ्वीराज महाडिक यांनी मानले.

मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या चारही दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांसह शेतकऱ्यांचा आणि लोकांचा झाला होता गर्दीचा उच्चांक. पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी प्रचंड गर्दी चार दिवस केली होती.शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे  आकर्षण ठरले.
चार दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी व खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
चार दिवसात सुमारे १५  कोटींची उलाढाल ही झाली.तर तिला बचत गटाच्या माध्यमातून २५ लाखाची उलाढाल झाली. बेगम राजू मुजावर यांनी बिर्याणी मधून १ लाख १० हजार रुपये विक्री केली, अमृता उमेश भोकरे यांनी १ लाख रुपयाचे मासे विकले तर ज्योती धावडे यांनी ५४ हजार ७०० रुपयांची विक्री केली. कल्याणी भिमगोंडा यांनी ४२ हजार रुपयांचे वस्तू विकल्या. या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
     
किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द  शो ठरला आहे

शतक वीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल
तीन वर्षाची राधा गाय आकर्षण मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर
भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण ठरले. आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा, राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळाला.भाज्यांमध्ये  फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस  खास आकर्षण ठरले.
सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील  अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे  येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले पहावयास चार दिवस शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या,  बोकड,  तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या होत्या. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी  आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह,  विविध जातीच्या कोंबड्या तसेच  विविध जातीचे  पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.
ज्यात अमेरिकन बेंटम बोकड  पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक  पांढरे उंदीर,  हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग  पांढरा उंदीर,टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरली.एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आकर्षण ठरली.

◼️आज झालेली व्याख्याने

१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील आणि  कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात यांनी मार्गदर्शन कृषी विभागाच्या विविध योजना सोबत पिक उत्पाद वाढीबाबत तंत्रज्ञान व ऊस पाच ट व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांचा डिजीटल मित्र महा विस्तार एआय या मोबाईल अँप्लिकेशन बद्दल माहिती सांगितली.

भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,  वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडेदादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे, डॉ.निवृत्ती पाटील, डॉ.सुखदेव साबळे, डॉ.अंकुश काळे,. डॉ.अजय कुरणे,डॉ.किरण उनउणे,प्रा.ऋतुराज चव्हाण, डॉ.मंगलसिंग जाधव,डॉ. वर्षा मिंड कृषी विभागाची टीम आदींनी परिश्रम घेतले त्यांचा सन्मान करण्यात आला.

◼️भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :

१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक पंधराशे रवे
२) इंद्रायणी तांदूळ : ४९०० kg
३) आजरा घनसाळ : २७०० kg
४) इंद्रायणी कणी : २२००  kg
५)  रत्नागिरी २४ :  ४८००  kg
६) सेंद्रीय हळद : ७०० kg 
७) नाचणी : ९५० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १५०० kg

◼️जनावरांचा निकाल

सहा दाती खिलार गाय गट

१)कृष्णात श्रीमंत मस्के रा. नांदगाव (प्रथम क्रमांक)

२)ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी रा. गादेगाव ता.पंढरपूर (द्वितीय क्रमांक)

३)चंद्रकांत अशोक शिराळे रा. तळंदगे ता. हातकणंगले  (तृतीय क्रमांक)

जुळूक गाय गट

१)रियांश रवी गवळी राहणार करवीर कोल्हापूर

मुरा रेडा गट

१) मनोज आण्णासो जगताप
रा. कवठे बुलंद तालुका  शिरोळ (प्रथम क्रमांक)

२) स्वप्निल अशोक पोवार रा. हसुर चंपू (द्वितीय क्रमांक)

३)सोहेल सय्यदअली पटेल रा.बसतवडे तालुका कागल (तृतीय क्रमांक)

जाफराबादी रेडा

१)फिरोज सरदार शेख रा. करनूर ता. कागल

पंढरपुरी रेडा गट
१) संजय अर्जुन जाधव रा. येलूर ता. वाळवा (प्रथम क्रमांक)
२).अमर आप्पाजी केंबळेकर रा. खुपिरे ता. करवीर (द्वितीय क्रमांक)

देवणी वळू गट
१)सौरभ परशराम सापनर रा. लिंबोटी ता. लोहा जिल्हा नांदेड

गिर वळू गट
१)कस्पक रघुनाथ सामंत रा. दरडेवाडी ता. आजरा जिल्हा कोल्हापूर (प्रथम क्रमांक)

२)बाळकृष्ण श्रीपाद सामंत रा. दरडेवाडी ता. आजरा जिल्हा कोल्हापूर (द्वितीय क्रमांक)

कंकरेच वळू गट
१)प्रविण शिवाजी गायकवाड रा.राशिवडे ता. राधानगरी

काल कंधारी वळू गट

१)कुलदिप बळीराम लाड रा. माळसुना ता. जिल्हा परभणी (प्रथम क्रमांक)

२)बळीराम मारुती लाड रा. माळसुळा ता. जिल्हा परभणी (द्वितीय क्रमांक)

३)परशराम नागनाथ सापनर रा.लिंबोटी ता. लोहा (तृतीय क्रमांक)

लाल कंधारी गाय गट

१) आनंदा नागुराव डोईफोडे रा. लिंबोटी ता.लोहा (प्रथम क्रमांक)
२)संभाजी पंडित गाडगीळ रा. लिंबोटी ता. लोहा द्वितीय क्रमांक

मुरा रेडी गट
१)शिवनाथ लक्ष्मण जगताप

बिटल बोकड
१)नितीन अनिल वड्ड राहणार भादोले (प्रथम क्रमांक)

२)प्रकाश आनंदराव घारगे राहणार गुडे तालुका पन्हाळा (द्वितीय क्रमांक)

अमेरिकन बॅनटम बोकडगट

१)अबुजर इनायन समाधान राहणार कागल

अमेरिकन बॅनटम शेळी गट

१अबुजर इनायन समाधान राहणार कागल

वराहगट
१)चंद्रकांत रामू ओऊळकर

वनराज कावेरी कुकुट पक्षी
१ अंडी उबवणी केंद्र

विविध प्रकारचे पक्षी
१)हैदरअली समाधान

लहान छोटे विविध प्राणी
१)खादिजा हैदरअली समाधान रा.कागल

अश्वगट
१) मंदार संजय इंगवले (प्रथम क्रमांक)

२)सुचित शिवकुमार हिरेमठ (द्वितीय क्रमांक)

३)संजय भगवान चौगुल (तृतीय क्रमांक)

४)असिफ अल्लबक्ष बागवान (तृतीय क्रमांक)

भीमथडी अश्वगट
१)कार्तिक दिपक बादूंगे

एच एफ गाय गट
१)विनायक भारत जंगम

२)भारत सदाशिव जंगम

जर्सी वळू गट
१)संदिप सात्ताप्पा एकल

जर्सी गाय गट

१)मंदाकिनी सदाशिव जंगम (प्रथम क्रमांक)
२)अरविंद निवृत्ती यादव (द्वितीय क्रमांक)

पुंगनूर  गाय गट
१)सुचित शिवकुमार हिरेमठ

इगवाना सरडा
१)किशोर चव्हाण

भीमा कृषी प्रदर्शन कृषी विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा मध्ये

१)रोहन प्रमोद चौगुले आणि शिवाजी धोंडीराम तोडकर यांच्या केळी घडास   विभागून प्रथम क्रमांक
२) महादेव शामराव पाटील चिकू क्रिकेट बॉल ( द्वितीय क्रमांक) ३)जयसिंग गजानन जाधव कसबा बावडा सुपारी मंगला (तृतीय क्रमांक)

अन्नधान्यांमध्ये
१)कृष्णात केरबा भोगम (नाचना) (प्रथम क्रमांक)
२)नारायण मारुती पाटील (स्वीट कॉर्न)(द्वितीय क्रमांक)
३)वसंत रामचंद्र यरोळकर नाचना (तृतीय क्रमांक)

फुले मध्ये
विनायक आनंदा कांबळे  जरबेरा (प्रथम क्रमांक) अनिता अनंत उठवणेकर आर्किटस फुले (द्वितीय क्रमां) युवराज बाळू पाटील झेंडू फुले (तृतीय क्रमांक)

भाजीपाला कंदवरनीय मसाला
१)विनायक नरहरी कोचरे हळद (प्रथम क्रमांक)
२)शितल शिवराज धर्माधिकारी सेंद्रिय आले  (द्वितीय क्रमांक)
३) विकास अशोक गोडसे सेंद्रिय हळद (तृतीय क्रमांक)

भाजीपाला
१)दिलीप बाबागोंडा   पाटील कोबी (प्रथम क्रमांक)
२)प्रदीप येलगुंडा खोत (वांगी) (द्वितीय क्रमांक)
३)दीपक मारुती डाफळे (ढोबळी मिरची) (तृतीय क्रमांक)

कंदवरनीय भाजीवाला
१)सागर रावसो मिनचे (बीट प्रथम क्रमांक
२) मधुकर केरबा भोगम (रताळी द्वितीय क्रमांक)
३) प्रकाश शामराव पडवळ (बीट) (तृतीय क्रमांक)

मसाले पीक
१) आप्पान्ना निजलिंग गुरव आप्पा (शंकेश्वरी मिरची) प्रथम क्रमांक
२)सुनील रावसो पाटील (कांदा विजय क्रमांक)
३) विठ्ठल मारुती पाटील (लसुन तृतीय क्रमांक)
१)प्रकाश अण्णा माळी (भोपळा प्रथम क्रमांक)
२)मलगोंडा भिमगोंडा पाटील (भोपळा विभागून प्रथम क्रमांक) ३)शंकर खोत दुधी (भोपळा द्वितीय क्रमांक)
४) अमोल दादासो चौगुले (कोहळा तृतीय क्रमांक)

मॉडेल कृषीमध्ये
१)तालुका कृषी अधिकारी करवीर (प्रथम क्रमांक)
२)प्रकल्प संचालक आत्मा द्वितीय क्रमांक
३)तालुका कृषी अधिकारी (हातकणंगले तृतीय क्रमांक)

भिमा कृषी पशु पक्षी प्रदर्शन
भिमा आदर्श गुणवंत पशुवैद्यक पुरस्कारमध्ये

१))मा. डॉ.  यशवंत वाघाय सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,गोदिंया
२)मा. डॉ.  मंगलसिंह जाधव
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,यवतमाळ
३)मा. डॉ.  किरण उणउने
पशुधन विकास अधिकारी,कोल्हापूर
४)मा. डॉ.  आनंदा पोवार
पशुधन विकास अधिकारी,गगनबावडा
५) डॉ.  बाबासो पुजारी
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,करवीर
६) डॉ.  सुखदेव साबळे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,चंदगड
७) डॉ. अंकुश काळे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,राधानगरी
८)डॉ.  प्रमोद झेंडे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, शिरोळ
९) डॉ.  भास्कर कुराडे
पशुधन पर्यवेक्षक,करवीर
१०) डॉ.  शशिकांत काटकर
पशुधन पर्यवेक्षक,हातकणंगले
११) डॉ.  गितांजली येरुडकर,पशुधन पर्यवेक्षक,राधानगरी,
१२) संतोष टिपुगडे वर्णउपचारक,राधानगरी. आदींचा सन्मान करण्यात आला.

◼️भिमा कृषी पशु पक्षी प्रदर्शन २०२६ पशुसंवर्धन संयोजक कमिटी मधील

डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर,डॉ. निवृत्ती पाटील, विलास इंगवले, सर्जेराव धनवडे
दिलीप दळवी, सुजित चव्हाण, अशोक सिध्दनेर्ले, किरण रणदिवे,
किरण सुर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes