+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustकोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगलेत परिसरात जोरदार पाऊस adjustगुरूची सेवा श्रेष्ठ : पं. राजरक्षित विजयजी
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule10 May 22 person by visibility 798 categoryविदेश
कोलंबो:  श्रीलंका प्रचंड राजनैतिक संकटाचा सामना करत आहे. वाढती महागाई, अन्नाचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा, भारनियमन, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी अशा अनेक समस्यांमुळे देशात अराजकता माजली आहे.अशात संतप्त जमावाने खासदार सनथ निशांत, महिपाल हेरथ आणि माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांची घरं पेटवून दिली. आंदोलकांनी हंबनटोटा येथील मेदामुल्लाना इथे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा त्यांचे धाकटे भाऊ गोटबाया राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घरही जाळले. त्याचप्रमाणे बंदरवेला येथील खासदार थिसा कुट्टियाराची यांच्या रिटेल स्टोअरलाही आग लावण्यात आली तर मंत्री कांचना विजेसेकेरा यांचे मतारा येथील घर आंदोलकांनी फोडले. 

  श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा महिंदा राजपक्षे यांचे लहान भाऊ गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. 

 २२ दशलक्ष लोकसंख्या असलेले दक्षिण आशियाई बेट म्हणजे श्रीलंका हे राष्ट्र १९४८ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात वाईट आर्थिक मंदीला सामोरे जात आहे. श्रीलंकेत नियमित वीज खंडित होत आहे, याशिवाय अन्न, इंधन आणि औषधांचा तीव्र तुटवडा आहे.

पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एका निवेदनात, त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की देशभरात अनेक आठवड्यांच्या व्यापक निषेधानंतर, अंतरिम एकता सरकार तयार करण्यात मदत करण्यासाठी ते राजीनामा देत आहेत.

श्रालंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी एका विशेष बैठकीत देशातील चालू असलेल्या राजकीय संकटावर उपाय म्हणून सत्तेतून पायउतार होण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.