'केआयटी' चीन मधील दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी 'कनेक्ट' होणार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा वेध घेऊन क्षितिज विस्तार
schedule23 Jan 25 person by visibility 412 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाने नुकताच चीन येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रणी असणाऱ्या विद्यापीठाशी शैक्षणिक करार केला आहे. केआयटी शांघाई जीआयो टॉग युनिव्हर्सिटी, शांघाई या १४० वर्ष परंपरा असणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार योगदान देणाऱ्या जागतिक स्तरावरील ४५ व्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यापीठासोबत कनेक्ट होणार आहे. तेथील स्कूल ऑफ मटेरियल सायन्स अँड इंजीनियरिंग या विभागा सोबत विद्यार्थी, प्राध्यापक एक्सचेंज प्रोग्रॅम करारा नंतर राबावला जाणार आहे.
त्याचबरोबर निंगशिया युनिव्हर्सिटी, यिनचुआन या ऊर्जा (एनर्जी) व धातू शाख (मटेरियल) विषयात काम करणाऱ्या विद्यापीठाशी पण करार झालेला आहे. लवकरच संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स ते आयोजन केले जाणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठात जाऊन ज्ञान घेणे, संशोधन करणे शक्य होणार आहे. आज पर्यंत केआयटी स्पेन, बल्गेरिया, पोलंड याचबरोबर आता चीन अशा देशांशी शैक्षणिक कराराच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलते शैक्षणिक वातावरण या निमित्याने विद्यार्थ्यांना अनुभवता येतील असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला. अशा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या शैक्षणिक करारातून आमच्या विद्यार्थ्यांना संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान समजवून घेण्यामध्ये फार मोलाची मदत होणार आहे अशा भावना संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी व्यक्त केल्या, कराराच्या वेळी महाविद्यालयाकडून संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व सचिव दीपक चौगुले चीन मध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते.
विद्यार्थी हिताच्या अशा प्रकारच्या करारासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली उपाध्यक्ष सचिन मेनन, अन्य विश्वस्त यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले.