SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणीप्रख्यात वास्तुशिल्पकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भिर्डी यांचे निधन

जाहिरात

 

प्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटक

schedule15 Feb 26 person by visibility 172 categoryगुन्हे

गडहिंग्लज: महागाव तालुका गडहिंग्लज) येथील 'घंटीचा झरा' ओढ्यात छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळालेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उकलले आहे. वन्य प्राण्याने हल्ला केल्याचा बनाव रचून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रविण चंद्रकांत चिंचेवाडी (वय ३४, रा. भडगाव) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​सुनिता संजय केसरकर (वय ४०) हिचा मृतदेह ११ फेब्रुवारी रोजी चेहरा व हात नसलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक दृष्ट्या हा वन्य प्राण्याचा हल्ला वाटत होता, मात्र सुनिताचे दागिने आणि मोबाईल गायब असल्याने पोलिसांना संशय आला. तपासात सुनिता व प्रविण यांचे गेल्या ६ वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. प्रविणचे लग्न झाल्याने तो तिला टाळत होता, मात्र सुनिताने लग्नाचा तगादा लावून नातेवाईकांना सांगण्याची धमकी दिल्याने त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले.

१८ जानेवारीला तिला निर्जन स्थळी नेऊन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह ओढ्यात फेकला, जेणेकरून वन्य प्राण्यांनी तो खावा आणि पुरावा नष्ट व्हावा. पोलिसांनी  प्रविणला ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes