अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपद
schedule15 Feb 26 person by visibility 64 categoryक्रीडा
रोहतक : महार्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात पार पडली. देशभरातील विविध 138 विद्यापीठांच्या1286 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत उच्च दर्जाची स्पर्धात्मकता दाखवली.
या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक उपविजेतेपद (Second Team Championship) पटकावले, ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब ठरली.
वैयक्तिक गटात अभिषेक देवकाते याने उत्कृष्ट धाव घेत ४ था क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ अभिनंदन सूर्यवंशी याने ५ वा क्रमांक पटकावला. चैतन्य रुपनावर याने १४ वा क्रमांक मिळवत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
इतर खेळाडूंमध्ये इराप्पा ब्याडगीने ३८ वा क्रमांक मिळवला, प्रविण कांबळे याने ५२ वा क्रमांक, तर सुमंत राजभर याने ५३ वा क्रमांक प्राप्त केला. सर्व खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीमुळे विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपद मिळवता आले.
संघाला प्रशिक्षक श्री प्रकुल पाटील मांगोरे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. के. बी. बेल्लद यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रोत्साहन ब ही संपूर्ण कामगिरी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली पार पडली.
विद्यापीठाच्या या यशस्वी कामगिरीमुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या प्रगतीला अधोरेखित करत सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.