SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

schedule15 Feb 26 person by visibility 64 categoryसामाजिक

कोल्हापूर  : भिमा कृषी प्रदर्शनामध्ये झालेल्या भागीरथी महिला संस्थेच्यावतीने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत, कोल्हापुरातील सीमा आलमेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत, पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्याशिवाय अन्य ११ स्पर्धकांनाही, भागीरथी संस्थेच्यावतीने पैठणी देण्यात आली. महिलांमधील निर्णय क्षमता, समयसूचकता आणि कौशल्य विकासाला चालना देणार्‍या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भिमा कृषी प्रदर्शन सुरु आहे. त्याअंतर्गत भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. 

खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, राजेश देशमुख,  वैष्णवी महाडिक,  अंजली महाडिक यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. खेळ पैठणीचा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाला, महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. संतोष वडर यांनी बहारदार निवेदन आणि सूत्रसंचालन केले. महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या. कौशल्य, अचूकता, निर्णय क्षमता, हजरजबाबीपणा, समयसूचकता, विविधांगी खेळ अशा प्रकारात, खेळ पैठणी अंतर्गत निवड चाचणी झाली.

या स्पर्धेत कोल्हापुरातील सीमा आलमेलकर यांनी विजेतेपद पटकावले. आलमेलकर यांना सौ. अरुंधती महाडिक आणि वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आले. खेळ पैठणीचा स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा आलमेलकर यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. या स्पर्धेत पल्लवी तपासे यांना दुसरा क्रमांक मिळाला. त्याशिवाय अन्य १० स्पर्धकांनाही पैठणी देण्यात आली. त्यामध्ये तृप्ती खाडे, प्राची जाधव, अश्‍विनी कदम, अनिता गिरी, पूजा वाडकर, शारदा लोहार, युगंधरा वाळवेकर, अवनि बिरंबोळे, शिल्पा फाळके आणि सायली सावंत यांनाही पैठणी देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes