SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

जाहिरात

 

20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार

schedule15 Feb 26 person by visibility 78 categoryक्रीडा

मुंबई  : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक २०२६: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकला.

 पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानी संघ १८ षटकांत ११४ धावांवरच मर्यादित राहिला. या विजयासह भारत सुपर ८ मध्ये पोहोचला.

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. पाकिस्तानच्या कर्णधाराने आज नाणेफेक जिंकली आणि त्यांची मजबूत फलंदाजी लक्षात घेऊन त्याने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. भारताने दिलेल्या १७५ धावांच्या प्रत्युत्तरात आज पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. या धावांचा पाठलाग करताना उस्मान खानने पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes