SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणीमुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा : पालकमंत्री ॲड.आशिष शेलारडीकेटीई येथे स्व. इंदुमती आवाडे जयंतीनिमित्त अभिवादनबळकट पावलं, सुरक्षित हात! कोल्हापुरी चर्मकलेच्या विकासासाठी महाडिकांचे ऐतिहासिक विधेयकशेतकरी आणि घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा; बिनशेती प्रक्रिया सुलभीकरणाचा निर्णय ऐतिहासिक : प्रकाश आबिटकरई प्रवर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावीभावी शिक्षकांनो, 'जनरेशन झेड'साठी आता केवळ बुद्ध्यांक नव्हे, मानसिक स्थैर्यही महत्त्वाचे! : प्रा. अजय साळी ​कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ला पदभ्रमंतीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कारनिरोगी भविष्याचा 'सुरक्षा कवच': राष्ट्रीय लसीकरण दिवस!

जाहिरात

 

अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी

schedule16 Mar 26 person by visibility 107 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीसाठी संभाव्य जागांची पाहणी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत केली. सकाळी १०.३० वाजता मुक्त सैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान तसेच के.एस.बी.पी. चौक या तीन ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

  यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना चारही ठिकाणाचा एकूण एरिया, लांबी-रुंदी यासह आवश्यक सर्व तांत्रिक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नामांकित आर्किटेक्टकडून स्मारकाचे डिझाईन तयार करून ते सादर करावे. त्यानंतर जागेच्या ठिकाणाबाबत अंतिम निर्णय महासभेत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, पदमल पाटील तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes