कोरे अभियांत्रिकीच्या १६ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
schedule17 Nov 25 person by visibility 76 categoryशैक्षणिक
▪️टेक्नीमॉट, प्रा. लि. मुंबई कंपनीचे ६.५० लाखांचे पँकेज
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) वारणानगर अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील, मेकँनिकल व केमिकल या तीन विभागातून १६ विद्यार्थ्यांची टेक्नीमॉट प्रा.लि, मुंबई या कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झाली. कंपन्यांनी महाविद्यालयात गटचर्चा’ इंटरव्ह्यू आयोजित करत पाच विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली. विद्यार्थ्यांना टेक्नीमॉट प्रा.लि, मुंबई अशा नामांकित कंपनीत ०६.५० लाखांचे पँकेजची नोकरीची संधी मिळाली अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा.पी. जे. पाटील यांनी दिली.
कॅम्पस इंटरव्यूच्या अगोदर कंपनीचे उच्च पदाधिकारी व वारणा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.विलास कारजिन्नी यांच्यामध्ये विविध विषयावरती व भविष्यातील संभाव्य संधी याच्यावर चर्चा झाली
टेक्नीमॉट प्रा.लि, मुंबई या ग्रुपमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील ५० हून ऑपरेटिंग कंपन्या आहेत. तेल आणि वायू, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, हरित रसायनशास्त्र आणि ऊर्जा संक्रमणास समर्थन देणार्या तंत्रज्ञानासारख्या विविध क्षेत्रात कंपनीचे व्यवसाय आहेत.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.विलास कारजिन्नी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा मौलिक सल्ला केला.
प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ . एस. एम. पिसे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा.पी.जे.पाटील, सहयोगी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख, प्रा.आर. सी. शिक्केरी. डॉ. के. आय. पाटील, डॉ. डी. एम. पाटील, डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक, प्रा. आर. टी. साळुंखे, प्रा. एस. एच. पाटील, प्रा. ए. आर. शिंगे, प्रा. पी. व्ही. कांबळे, प्रा. मनीष पाटील, प्रा. अनिकेत हंकारे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
निवड झालेले विद्यार्थी: सिव्हिल विभाग – खोत सुजाता तानाजी, गावडे शुभम संजय, परीट प्रतीक्षा अप्पाशा, वरेकर ऋतुजा मानसिंग, गडकरी तन्वीर इब्राहिम आणि कडवेकर रसिका दिपक.
केमिकल विभाग – उत्कर्ष प्रकाश गाडगीळ, प्रज्ञा प्रकाश जाधव, प्राजक्ता नांदिप मोरे, मृणाल राजाराम सतम, संग्राम किशोर भोसले, तन्वी परशुराम पाटील.
मेकॅनिकल विभाग – दर्शना दत्तात्रय कंग्राळकर, करनसिंह रघुनाथ चव्हाण, नम्रता संपत माळी, संकेत कृष्णा पाटील.