कोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाई
schedule17 Nov 25 person by visibility 136 categoryमहानगरपालिका
▪️2 हातगाड्या, 22 स्टॅण्ड बोर्ड, 1 तंदूर भट्टी, 9 लोखंडी जाळी, 18 लोखंडी टेबल, 7 खॉट जप्त
कोल्हापूर : शहरामध्ये वाहतूक अडथळयांना कारणीभूत ठरणा-या अनाधिकृत अतिक्रमणांविरुध्द महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आज कारवाई करण्यात आली. माळकर तिकटी, मटन मार्केट रोड ते बिंदू चौक, आझाद चौक ते उमा टॉकीज तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय मेनरोड या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 2 हातगाड्या, 22 स्टॅण्ड बोर्ड, 1 तंदूर भट्टी, 9 लोखंडी पार्किंग जाळी, 18 लोखंडी टेबल, 7 लोखंडी खॉट असे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय रंकाळा मेनरोड, गंगावेश, फुलेवाडी या मुख्य रस्त्यावरील 16 डिजीटल बोर्ड, 195 लहान जाहिरात बोर्डवरही कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक जाधव, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, रविंद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे व अतिक्रमण व शहर वाहतूकीच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.