SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात एलसीबीची मोठी कारवाई: ४ सराईत चोरे जेरबंद, १० गुन्हे उघडकीस! ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्तडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवडकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिमी पावसाची नोंदकोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच; राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३६.०६ फुटांवर, ६० बंधारे पाण्याखालीजागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन: जागरूकता आणि आरोग्य रक्षणअर्जेंटिनाचा 'महा-चमत्कार': २-० ने पिछाडीवर असूनही इजिप्तचा केला धुव्वा; थरारक विजयासह क्वार्टरफायनलमध्ये धडक!संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज, सतर्क राहण्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांचे निर्देश8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रमप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवड

schedule08 Jul 26 person by visibility 105 categoryराज्य

▪️मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह उत्साहात;  नामांकित औषधनिर्माण कंपन्यांचा सहभाग 
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह–२०२६ उत्साहात संपन्न झाला. फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक संस्था आणि औषधनिर्माण उद्योग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.  

या कॅम्पस ड्राइव्हला विविध फार्मसी महाविद्यालयांतील ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग नोंदविला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या  १६ विद्यार्थ्यांची एमबी केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, फायझर आणि झायडस फार्मा या आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग तसेच सेल्स अँड मार्केटिंग विभागासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गोवा व पुणे येथील कंपनीच्या प्रकल्पांमध्ये संधी मिळाल्या आहेत.

भरती प्रक्रियेमध्ये एम. बी. केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल, ग्लेनमार्क, इंडोको, फायझर, सेंचॉर, एफडीसी आणि झायडस फार्मा, यशस्वी ग्रुप यासह  अनेक नामांकित औषधनिर्माण कंपन्यांनी सहभाग घेतला. सहभागी कंपन्यांनी पुणे, कोल्हापूर, बेंगळुरू आणि गोवा येथे रोजगाराच्या आकर्षक संधी उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना नामांकित औषधनिर्माण कंपन्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची, आपले तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता सादर करण्याची तसेच उज्ज्वल करिअरच्या संधींचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या उपक्रमातून मिळाली. कंपन्याच्यावतीने ब्रजमोहन अग्रवाल, प्रदीप देसाई, साहिल पाटील, नंदकुमार पाटील, निलेश राऊत आणि विठ्ठल खराडे यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वैष्णवी कौलगे आणि डॉ. सोनाली दिवटे यांनी केले तर आभार डॉ. अभिनंदन पाटील यांनी  मानले. नियोजन व  समन्वय महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख आशुतोष पी. कांबळे यानी केले. 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes