इचलकरंजी कबनूर मार्गावरील युवकाच्या खून प्रकरणी ४ आरोपींना ८ तासांच्या आत अटक
schedule28 Oct 25 person by visibility 252 categoryगुन्हे
कोल्हापूर : इचलकरंजी कबनूर मार्गावरील अभिनंदन जयपाल कोल्हापूरे या युवकाच्या खून प्रकरणी ४ आरोपींना ०८ तासांच्या आत अटक करण्यात आली. १) पंकज संजय चव्हाण वय २७, रा. वारणा शॉपी जवळ, फॅक्टरी रोड, कबनूर २) रोहित जगन्नाथ कोळेकर वय २४, रा.श्रध्दा हायस्कूल शेजारी, कागल, ३) विशाल राजू लोंढे वय ३१, रा. कामगार चाळ, लालनगर, इचलकरंजी ४) आदित्य संजय पवार वय २१, रा. कामगार चाळ, लालनगर, इचलकरंजी, यांना अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ०१.०० वा ते ०२.०० वा.च्या दरम्यान इंदिरा हौसिंग सोसायटी कबनूर येथील घरातून अभिनंदन जयपाल कोल्हापूरे वय ४४ यांना पंकज चव्हाण व त्याचे सोबतचे ३ ते ४ इसमांनी वैशाली हॉटेल येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरुन पोलीस ठाणेस जायचे आहे असे त्याचे वडिलांना सांगून मयत अभिनंदन कोल्हापूरे यांना त्यांचेकडील मोटर सायकलवर बसवून कबनूर ते कोल्हापूर रोडवरील कबनूर गावचे हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोल पंपा समोर घेवून जवून अभिनंदन कोल्हापूरे याचे डोकीत सिमेंटचा गोलाकार पाईप घालून, जबर दुखापत करुन त्याचा खुन केला होता याबाबत फिर्यादी डॉ अभिषेक जयपाल कोल्हापूरे वय ४२, यांनी दिली फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.
तपास पथकाला आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार हे चौंडेश्वरी फाटा, चिपरी, ता. शिरोळ येथे येणार असलेबाबत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस पथकासह चौडेंश्वरी फाटा येथे सापळा लावून आरोपी १) पंकज संजय चव्हाण २) रोहित जगन्नाथ कोळेकर ३) विशाल राजू लोंढे ४) आदित्य संजय पवार यांना ताब्यात घेण्यात आले आरोपींकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी आरोपी रोहित कोळेकर याचे बरोबर हॉटेल वैशाली येथे रात्री झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन अभिनंदन कोल्हापूर यास त्याचे घरातुन अपहरण करुन त्याचे डोक्यात सिमेंटची पाईप टाकुन त्याला ठार मारल्याची कबूली दिलेली आहे. यातील आरोपींना गुन्हयाचे पुढील तपास कामी शिवाजीनगर पोलीस ठाणेच्या ताबेत देणेत आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, अतिष महेत्रे, पोलीस अंमलवार महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले, सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांचे पथकाने केलेली आहे.