SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपणकळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलीआवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यताकोल्हापूर मनपा स्थायी समितीत सदस्यांचा संताप: कारभार ढिसाळ, अधिकाऱ्यांची मनमानी; पाणी आणि स्वच्छतेवरून प्रशासन धारेवरवाचन संस्कृती वृद्धिंगत करीत राहणे आवश्यक : जयवंत आवटेडीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी निवडधबधब्यात पोहताना १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; चंदगड परिसरात हळहळगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नकाजागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गती

जाहिरात

 

डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी निवड

schedule10 Aug 26 person by visibility 94 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेतील इंजिनिअरींग विभागातील तब्बल ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योगविश्‍वाचा अनुभव देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. एवढया मोठया संख्येने विद्यार्थ्यांची एकाच वेळी इंटर्नशिपसाठी झालेली निवड ही डीकेटीईच्या उद्योगाभिमुख शिक्षणपध्दतीची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची ठोस पावती आहे.

  यामध्ये इएनटीसी मधून ८९, सीएसई मधून १२३, एआयएमएल मधून ११७, एआयडीएस मधून ४१, इलेक्ट्रीकलमधून ७६, सिव्हीलमधून १२ व मेकॅनिकलमधून ४६ असे एकूण ५०४ विद्यार्थी इंटर्नशिपसाठी निवड झाले आहेत. ५०४ विद्यार्थ्यांची ही निवड डीकेटीईच्या गुणवत्तपूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याची पावती आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, मेहनत आणि जिददीला उद्योगविश्‍वाने दिलेली ही दाद असून, भविष्यातील कुशल व सक्षम अभियंते घडविण्याच्या डीकेटीईच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे.

  या इंटर्नशिपचे आणखी एक वैशिष्टये म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीचे मूल्यमापन कंपन्यांकडून करुन इंटर्नशिपच्या काळात आपल्या कौशल्यांची प्रभावी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कंपन्याकडून थेट नोकरीची संधी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप त्यांच्या करिअरची महत्वपूर्ण सुरवात ठरली आहे.

  आजच्या बदलत्या औद्योगिक क्षेत्रात केवळ शैक्षणिक ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक कौशल्ये आणि उदयोगांच्या गरजानुसार काम करण्याची क्षमता असलेल्या अभियंत्यांना अधिक मागणी आहे. ही गरज लक्षात घेवून डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, प्रकल्पाधारित शिक्षण, तज्ञांच मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाच्या विविध संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधीची प्रत्यक्ष ओळख व्हावी, उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करता यावे आणि रोजगाराच्या संधींना आत्मविश्‍वासाने सामोरे जाता यावे, यासाठी डीकेटीईकडून सातत्याने विविध कंपन्यांशी उद्योगसहभाग वाढविला जात आहे. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून यंदा ५०४ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.

  या यशाबददल संस्थचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या.  विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, सर्व विभागप्रमुख, टीपीओ इंजिनिअरींग यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes