अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवानानाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच उपक्रम
schedule09 Jan 26 person by visibility 33 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले,शिरोळ,राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत,होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे.
निवड झालेले हे विद्यार्थी बेंगळुरू व हैदराबाद येथील इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती,प्रक्षेपण प्रक्रिया,अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्याने विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे मिळणार आहे.केवळ पुस्तिकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून हे विद्यार्थी तेथील वैज्ञानिक वातावरण अनुभवणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद,महानगरपालिका शाळां मधील सुमारे 280 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत,राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगून या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल असा आशावाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला .तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या .
मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये यांची काळजी शासनाने घेतलेली आहे.सामाजिक समानता,संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने टाकलेले सामाजिक न्याय विभागाचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यावेळी समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उप आयुक्त, श्रीमती वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सचिन साळे, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती अश्विनी नराजे,समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील,वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती सुप्रिया काळे,समाज कल्याण निरीक्षक सुनील पाटील,अतुल पवार,श्रीमती चित्रा शेंडगे,सुभाष पवार,सचिन परब,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पालक उपस्थित होते.

