संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड
schedule09 Jan 26 person by visibility 194 categoryशैक्षणिक
कोल्हापूर अतिग्रे: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६० विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे प्रतिनिधी लवेश सोनी व निखिल काळे हे उपस्थित होते. हा जॉब फेअर कार्यक्रम संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
या मुलाखत प्रक्रियेसाठी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील, आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य अविनाश पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्राध्यपिका रईसा मुल्ला, इन्स्टिट्यूट अकॅडमिक डीन प्रा. रविंद्र धोंगडी डिपार्टमेंट समन्वयक सुशांत पाटोळे, भाग्यश्री भालकर, प्रथमेश गोंधळी यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

