उत्तम काम भक्कम नेतृत्व; प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपचे उत्तम पाटील यांना वाढता प्रतिसाद
schedule09 Jan 26 person by visibility 140 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध समस्या, विविध प्रश्नावरती आपच्या आंदोलनातील सक्रिय चेहरा म्हणून उत्तम पाटील यांच्याकडे पाहिले जाते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन मधून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील निवडणूक लढवत आहेत. "Kolhapur deserves better" यानुसार कोल्हापूरकरांना उत्तम रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम नेत्यांची गरज आहे यासाठी प्रभागात आपल्या माध्यमातून सक्रिय पर्याय आपण दिला असून प्रभागांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. तसेच प्रभागामध्ये पाच वर्षांमध्ये होणाऱ्या विविध विकास कामाबाबत गॅरेंटी कार्ड काढले असून त्यांची पूर्तता नक्की करणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रमांक तीन मधून आम आदमी पार्टीचे उत्तम पाटील निवडणूक लढवत असून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संपर्क करून आपची भूमिका पटवून देत प्रचारामध्ये गती घेतली आहे. प्रभागामध्ये करण्यात येणाऱ्या विविध कामाबाबत गॅरेंटी कार्ड काढले असून त्यामध्ये होणाऱ्या कामाविषयी ते मतदाराला माहिती देत असून यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
🔹अपार्टमेंट व बंगल्यांमधील झाडाच्या फांद्या-पाने उठावासाठी सक्षम यंत्रणा उभारणार.
🔹भटक्या कुत्र्यांचा धोका नियंत्रित करण्यासाठी नसबंदी मोहिमा आयोजित करणार.
🔹पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेले रस्ते एका महिन्यात पूर्ववत करणार.
🔹स्टार बाजार चौक, जाधववाडी चौक येथील ट्रॅफिकच्या नियोजनासाठी आराखडा बनवणार.
🔹शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत परिसरातील उद्यानांची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी यंत्रणा उभारणार.
🔹महापालिकेत एकूण 167 अभियंतांची गरज असताना फक्त 30 कार्यरत आहेत. अभियंतांच्या भरतीसाठी आग्रही राहणार.
🔹प्रभागाची सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये AI कॅमेरे.
🔹दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र डिझाईन व क्वालिटी कंट्रोल विभागासाठी पाठपुरावा.

