डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध
schedule09 Jan 26 person by visibility 278 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : उत्कृष्ट शैक्षणिक नियोजन, निरंतर मूल्यमापन, वैयक्तिक मार्गदर्शन, शिस्तबद्ध अभ्यास पद्धती अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतनची उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने हिवाळी परीक्षा 2025च्या जाहीर केलेल्या निकालांमध्ये इन्स्टिट्यूट गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ' हब ' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले .
विशेष गुणवत्तेसह प्रथम श्रेणी तसेच प्रथम श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पद्धती, शैक्षणिक सुविधा, आकलन आणि उपयोजन क्षमतेवर भर, योग्य संरचना असलेली अध्यापन पद्धती, आउटकम बेस्ड एज्युकेशन अंतर्गत साधनांचा वापर अशा घटकांचा प्रभावी वापर केल्यामुळे हे उज्वल यश प्राप्त झाले. उच्च शैक्षणिक दर्जा राखण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच परिणामकारक शैक्षणिक गुणवत्ता नियंत्रण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढला. उत्तम शैक्षणिक वातावरणामध्ये शिक्षकांचा अखंड पाठिंबा विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
याविषयी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी " शिस्तबद्ध शैक्षणिक नियोजन, सर्वसमावेशक आणि प्रासंगिक संकल्पनांचा समावेश आणि शिक्षण प्रक्रिया अधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे गुणवत्ता वाढ होत असते. अधिक सक्षम शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. " असे नमूद केले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी " गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वसनीय केंद्र म्हणून आमची ओळख निरंतर ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवित आहेत ", असे प्रतिपादन केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले असून त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शैक्षणिक उपक्रमांच्या संचालनासाठी अकॅडमिक कोऑर्डिनेटर प्रा. कुलदीप नरके यांनी परिश्रम घेतले.
विशेष उल्लेखनीय विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे :
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग: प्रथम वर्ष - धूपद ऋग्वेदी अमित (91.53%), द्वितीय वर्ष - बुधले रिधिमा (90.59%), तिवारी दीक्षा (87.53%), तृतीय वर्ष - काटिगर तानिया उमेश (96.94%),ओतारी अनुष्का सुनील (96.59%), राऊळ श्रीणेश सतीश (95.88%)
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग : प्रथम वर्ष - तिवले आदिनाथ तानाजी (86.94%), द्वितीय वर्ष - कोळेकर अधिराज (91.29), पाटील पायल सुदाम (91.18%) , पन्हाळकर ऋतुजा (90.47), तृतीय वर्ष - नरके समृध्दी (97.53%), आदनाईक श्रावणी (97.06%), बांधिगरे वैष्णवी (96.94%)
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : प्रथम वर्ष - पाटील सप्तर्षी रविराज (80.35%), द्वितीय वर्ष - सावंत केदार प्रल्हाद (82.44%), तृतीय वर्ष - पाटील सनराज अरविंद (93.65%) देसाई सृष्टी वसंत (92.94%)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : प्रथम वर्ष - गावडे प्रणाली नितीन (84.35%), द्वितीय वर्ष - नरके श्रुती रघुनाथ (90.24%), पाटील राजवीर प्रताप (90%), तृतीय वर्ष - कळंत्रे श्रीजीत दिपक (92.82%) , पवार विद्या अविनाश (91.77%), जकाते निदा तबरेजखान (91.18%)
सिव्हिल इंजिनिअरिंग : प्रथम वर्ष - पडळकर वैष्णवी संभाजी (87.06%), द्वितीय वर्ष - पाटील अनुष्का (82.35%), तृतीय वर्ष - सिंग प्रिन्स (88.78%)

