SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटीलकोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवराज कामतेचे देदीप्यमान यशआंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरणबाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकटकर्तव्यासाठी समर्पण: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनरांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदकोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्तभरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवराज कामतेचे देदीप्यमान यश

schedule14 Apr 26 person by visibility 120 categoryक्रीडा

कोल्हापूर : सांगली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २२ व्या खुल्या फिडे रेटिंग जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या शिवराज उत्तम कामते याने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत ८ वर्षाखालील वयोगटात घवघवीत यश संपादन केले. अनुज् चेस ॲकॅडमीचा विद्यार्थी असलेल्या शिवराजने या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्यांपैकी ३.५ गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, शिवराजने मिळविलेल्या ३.५ गुणांपैकी १.५ गुण हे आंतरराष्ट्रीय मानांकन (रेटेड) असलेल्या अनुभवी खेळाडूंविरुद्ध झुंज देऊन मिळवले आहेत. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच त्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन (FIDE Rating) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतक्या लहान वयात त्याने दाखवलेली एकाग्रता आणि खेळातील कौशल्य कौतुकास्पद ठरत आहे.


शिवराजला या स्पर्धेसाठी जिल्हा चेस असोसिएशन कोल्हापूरचे खजिनदार आणि बुद्धिबळ प्रशिक्षक बाबूराव पाटील तसेच प्रशिक्षिका अनुष्का कृष्णात पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes