आंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरण
schedule14 Apr 26 person by visibility 95 categoryसामाजिक
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेरवाड गावात समाजसेवेचा आदर्श घालून देणारा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक बांधिलकी जपत सरपंच रेखा अर्जुन जाधव व त्यांच्या परिवाराच्या वतीने आरोग्य उपकेंद्र, हेरवाड येथे रुग्णांसाठी तब्बल ४० लिटर कफ सिरपचे वितरण करण्यात आले.
सध्या बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढत असताना या औषधांचे वितरण रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या मदतीमुळे अनेक रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले असून सर्व स्तरांतून सरपंच रेखा अर्जुन जाधव व त्यांच्या परिवाराचे कौतुक होत आहे. “समाजसेवा हीच खरी मानवसेवा” या विचारातून प्रेरित होऊन करण्यात आलेल्या या कार्याने आंबेडकर जयंतीला वेगळी सामाजिक दिशा दिली आहे.
यावेळी गटनेते सुनील माळी, बी. एम. देशमुख सर, अमोल कांबळे, संदीप कांबळे, विशाल कांबळे, सुकुमार पाटील, दत्तात्रय जोंधळे, आयाज मुल्ला, रोहन मोहिते, आरोग्यसेवक शरद कोळी, डॉ. गिरमल मॅडम, आरोग्यसेविका तेली सिस्टर तसेच आशासेविका शशिकला कांबळे व दिपाली कांबळे आदी उपस्थित होते.