पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळयातील दागीने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक
schedule15 Oct 25 person by visibility 93 categoryगुन्हे

विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळयातील दागीने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली त्याच्याकडून 1,60,000/- रुपये किंमतीची सोन्याचे दोन मणी मंगळसुत्रे हस्तगत करण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेस महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात.
यात्रा कालावधीतील चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गर्दीचे ठिकाणी साध्या वेशातील पोलीसांची पायी पेट्रोलिंग करून, कोणीही इसम संशयितरित्या मिळून आलेस त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
पथक यात्रेमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मरगुबाई देवालयाचे जवळ एक इसम संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आला. तेव्हा त्यास ताबेत घेवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव सुनिल शशीराव शिंदे वय 32, रा. इंदिरानगर, पाथरी, ता. पाथरी, जि. परभणी असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्या त्याच्याकडून 1,60,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दोन मणी मंगळसुत्रे मिळून आलेने ते हस्तगत केलेले आहेत. सुनिल शिंदे याचा पुर्वइतिहास पाहता त्याचेवर परभणी व बीड जिल्हयांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सदरचे दागीने त्याने विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेवून महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरी केले असलेचा संशय निर्माण झालेने त्याचेवर पोहेकॉ. युवराज पाटील यांनी दिले फिर्यादीवरुन हुपरी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. याच शिवाय यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेवून संशयास्पदरित्या वावरतअसताना मिळून आलेल्या 8 पुरुष व 6 महिलांना ताबेत घेवून त्यांचेवर भारतीय सुरक्षा कायदा कलम 128 प्रमाणे कारवाई केलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार गुप्ता साो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतिश जंगम, समीर कांबळे, विशाल चौगले, प्रदिप पाटील, राजू कांबळे, सतिश सुर्यवंशी, सागर चौगले यांचे पथकाने केलेली आहे.