कोल्हापुरात विनापरवाना उभारलेले फटाका विक्री स्टॉल व्यावसायिकांनी स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा ...
schedule15 Oct 25 person by visibility 141 categoryमहानगरपालिका

▪️कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणुकीस मनाई
कोल्हापूर : फटाके साठवणे/विक्री करण्याकरीता जनहित याचीका क्र.152/2015 वर मा. उच्च न्यायालयाचे दि.17 ऑक्टोंबर 2016 व दि.25 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या आदेशानुसार व शासन निर्णय क्रमांक याचीका- 2016/प्र.क्र.432/नवि-20 दिनांक 05 नोव्हेंबर 2016 च्या निर्णयातील मुद्दा क्र. 2 नुसार सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणुक करण्याचे नाही असे निर्देशित केले आहे. तरी देखील दिवाळी निमित्त तात्पूरता फटाका विक्री करण्यासाठी खुल्या जागेव्यतीरिक्त रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल टाकलेचे निदर्शनास आले आहे.
हे स्टॉल टाकताना काही व्यवसायधारक कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर तसेच इतर व्यवसायाच्या दुकानामध्ये फटाका विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर इतर व्यवसायासाठी मंडपास परवानगी घेवून नंतर फटाका व्यवसाय केला जात असलेचे निदर्शनास आले आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी फटाक्यामुळे दुर्घटना घडून जिवीत अथवा वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा फटाके विक्री व साठवणूक करणा-या व्यवसायधारकांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. ज्या व्यवसाय धारकांना तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल टाकावयाचे आहेत त्यांनी मोकळया मैदानावर स्टॉल टाकण्यासाठी परवानगी घ्यावी.
तरी सदरचे विनापरवाना असलेले स्टॉल गुरुवार, दि.16 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा सदरच्या व्यवसायिकावर कायदेशीर कारवाई करुन सदरचा माल जप्त करण्यात येईल याची व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत करण्यात आले आहे.