नांदणी नाका येथे पत्याचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांकडून 1,94,960/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule15 Oct 25 person by visibility 96 categoryगुन्हे

कोल्हापूर : नांदणी नाका, ता. शिरोळ येथे पत्याचा जुगार खेळ खेळणारे 8 जनांकडून 44,960/- रुपये रोख रक्कमेसह एकूण 1,94,960/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
धरणगुत्ती, ता. शिरोळ गावचे हद्दीत लमाणवस्ती नांदणी नाका येथे इराप्पा चव्हाण याचे मालकीचे बंद खोलीत काही इसम पत्याचे पानाने जुगार खेळ खेळत आहेत. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे आदेशान्वये सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथकाने दि. 15 ऑक्टोंबर रोजी रात्रौ 00.50 वा. चे सुमारास नांदणी नाका शिरोळ येथील लमाणवस्ती येथील इराप्पा चव्हाण यांचे बंदीस्त खोलीत छापा टाकला. सदर ठिकाणी 01) सचिन मारुती जाधव, वय 25, रा. समडुळे मळा शाहुनगर नांदणी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, 02) कार्तिक दिपक कलकुटगी वय.30, रा. दिवाणजी सोसायटी पाण्याचे टाकीजवळ जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 03) मिथुन बाबासाहेब नरळे, वय.27, रा. बेघर वसाहत धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 04) कुमार राजू पवार, वय.30, रा.लमाणवस्ती नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 05) बाबू आण्णाप्पा पवार, वय 25, रा. लमाणवस्ती नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 06) अजय सावंत बाटुंगे, वय 25, रा. मणाली हॉटेल समोर नांदणी नाका धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 07) ओंकार दिपक कलकुटगी, वय.28, रा. दिवाणजी सोसायटी संभाजीपूर नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, 08) यश सचिन वडर, वय 19, रा. लमाणवस्ती नांदणी नाका धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर हे पत्याचे पानाचा जुगार खेळ खेळत असताना मिळुन आले. त्यांचे कब्जात 44,960/- रु रोख रक्कम, 06 मोबाईल हँन्डसेट, एक मोटर सायकल व इतर जुगाराचे साहित्य असे एकूण 1,94,960/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळून आला, नमुद इसमांविरुध्द जुगार कायद्यान्वये शिरोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार. अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, संजय पडवळ, रामचंद्र कोळी, रुपेश माने, अनिकेत मोरे व सुशिल पाटील यानी केलेली आहे.