SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षाकोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंदआंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन: पर्वतांच्या भूताचे अस्तित्व आणि संवर्धनाचा लढाजलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

जाहिरात

 

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

schedule23 Oct 26 person by visibility 90 categoryमहानगरपालिका

◼️गेल्या दहा दिवसात थकबाकीपोटी 61 लाख 44 हजार 882 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकाच्या चार पथकामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी या पथकामार्फत करण्यात येत आहे.

याअंतर्गत गेल्या दहा दिवसात शहर पाणी पुरवठा व उपद्रव शोध पथकाने शहर व ग्रामीण भागातील कारवाईमध्ये थकबाकीपोटी 62 कनेक्शन धारकांवर कारवाई करुन कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये थकबाकीपोटी रु.61 लाख 44 हजार 882 रुपये वसुल केले तर 9 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करण्यात आले. तसेच 1 कनेक्शनधारकाने मोटीरी वापरलेचे निदर्शनास आल्याने सदरच्या मोटर जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने करण्यात आली. या कारवाईमध्ये उपद्रव पथक प्रमुख बाळासाहेब पठाण, संजय चौगुले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण व पाणी पुरवठाकडील लिपीक, मिटर रिडर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

हि मोहीम शहर व ग्रामिण भागात अधिक तिव्रतेने राबविण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी त्यांचे अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अधिकृत करून घ्यावे व होणारी आर्थिक दंडाची तसेच फौजदारी कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes