कसबा बावडा झूम प्रकल्पाला प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
schedule03 Nov 25 person by visibility 49 categoryमहानगरपालिका
        ▪️प्रकल्पाच्या ठिकाणी दुरुस्तीच्या 15 लाखाचा व रस्ते कामाच्या दुरुस्तीसाठी 15 लाखाचा निधी मंजूर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कासबा बावडा झूम प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या विविध प्रकल्पाला आज दुपारी प्रशासक श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या 20 टीपीडी क्षमतेच्या नव्या बायोगॅस प्रकल्पाची सर्व काम पूर्ण झाले असून लवकरच त्याच्या लोकार्पणाची तयारी करण्याच्या सूचना प्रशासकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर या ठिकाणी जुन्या 30 टीपीडी बायोगॅस प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 15 लाखाचा निधी उपलब्ध करुन देऊ. यामधून जुन्या प्रकल्पाची डागडुजी व इतर दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी नवीन बांधण्यात आलेल्या नव्या प्रकल्पातील मिक्सर, विंडो यंत्रणा व इतर सुविधांची माहिती घेऊन 150 टन क्षमतेच्या आर.डी.एफ. युनिट व 53 टन क्षमतेच्या विंडो कंपोस्ट खत प्रकल्पाची पाहणी करून त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी आतील विंडो रोड प्रोसेसिंगला जाणा-या रस्यांे्ची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच झूम प्रकल्पाच्या बाहेरुन या प्रकल्पाकडे येणा-या सर्व रस्यांथुची वर्दळीमुळे खराब झाली असल्याने हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी 15 लाखाचा स्वतंत्र निधी मंजूर देण्यात येणार असून त्यामधून येथील रस्ते दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी विलास साळोखे, उप-शहर अभियंता निवास पोवार, अरुण गुर्जर व कनिष्ठ अभियंता अरुण गवळी उपस्थित होते.