माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
schedule03 Nov 25 person by visibility 50 categoryराज्य
कोल्हापूर : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या ज्या पाल्यांनी 12 वी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पात्र पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पात्र पाल्यांनी www.ksb.gov.in या वेबसाईटवर 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहान जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9172035612 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.