डीकेटीईचे प्रा. जी.सी.मेकळके यांना पी.एच.डी. प्रदान
schedule03 Nov 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक
        इचलकरंजी : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. जी.सी. मेकळके यांना विश्वेश्वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळागांवी यांचेकडून पी.एच.डी. इन मेकॅनिकल इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा जी.सी. मेकळके हे गेली १२ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ मेकॅनिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ग्लास कार्बन फायबर रीइननफोरर्सड पॉलीमर कम्पोझिटस फॉर अॅटोमोबाईल अॅप्लीकेशन’ या विषयावर पी.एच.डी.प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी त्यांना साईविद्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगलोर चे मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. राघवेंद्र एस यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ. एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील विभागप्रमुख प्रा.डॉ. व्ही.आर. नाईक उपस्थित होते.