प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरगुती गणपतीचे केले पर्यावरण पूरक विर्सजन
schedule28 Aug 25 person by visibility 273 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरातील गणेश मुर्तीचे आज पर्यावरण पूरक विसर्जन केले.
महापालिकेने ताराबाई पार्क येथे ठेवलेल्या पर्यावरण पूरक विर्सजन कुंडामध्ये हे विर्सजन केले. यावेळी त्यांच्या सोबत पती सबरीश पिलाई, मुलगा निलमाधव व मुलगी मिनाक्षी उपस्थित होते.
पर्यावरण पूरक गणेश मुर्तीचे विसर्जन करताना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व कोल्हापूरातील नागरीकांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पर्यावरण पूरक गणेश मुर्तींचे विर्सजन करुन कोल्हापूर महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.