जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका मतदारांना आवाहन
schedule15 Jan 26 person by visibility 70 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिकेसाठी मतदान सकाळी ७:३० वाजता सुरू झालेलं आहे. सर्व ठिकाणी मतदान सुरळीतपणे सुरू असून मी होली क्रॉस शाळेतील मतदान केंद्रावरती मतदान केले. माझं सर्व कोल्हापूरवासियांना, इचलकरंजीवासियांना नम्र आवाहन आहे की, मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला अमूल्य अधिकार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा.
ज्यांनी आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे, त्या सर्व सुजाण नागरिकांचे अभिनंदन आणि ज्या ज्या मतदारांनी अजूनही मतदान केलेलं नाही, त्यांना विनंती आहे की, सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवावीत, सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि कोल्हापूरचा मतदानाचा टक्का नेहमी राज्यामध्ये आघाडीवरती राहिलेला आहे, तो आघाडीवरती ठेवून लोकशाही बळकटीकरणामध्ये सहभाग दाखवावा.