SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजनव्यवसाय वृध्दी व उत्पादनाची पोर्टलवर होणार जाहिरात

जाहिरात

 

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

schedule03 Feb 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक

मुंबई :  राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) दि. 26 एप्रिल 2026 रोजी एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरीता शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी नियमित शुल्कासह 13 फेब्रुवारी, विलंब शुल्कासह 14 ते 20 फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह 21 ते 24 फेब्रुवारी तर अति विशेष विलंब शुल्कासह 25 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes