मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
schedule10 Oct 25 person by visibility 55 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता 1 ली ते 7 वी व 8 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करुन, शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करावे. (मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती समाविष्ट) विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्यावत करावी.
विद्यार्थी पात्र असलेल्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करुन योजना लागू करावी आणि ऑनलाईन अर्ज मुख्याध्यापकांच्या लॉगिनवरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे पुढे पाठविण्यात यावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील इ. ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदाने, माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करणे, इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती लागू करणे, इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करणे, इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकत असणाऱ्या डी. एन.टी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती केंद्र पुरस्कृत योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर https://permatric mahait.org ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.