दिव्यांग बालक सक्षमीकरण- शासन योजना स्टॉलची उभारणी
schedule10 Oct 25 person by visibility 70 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के. बी. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, स्वराज्य भवन, कोल्हापूर येथे दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत,
अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक अधीक्षकांनी परिपत्रकाव्दारे दिली आहे.