कोल्हापूर : जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू राजू कोळी या एम.एस्सी. भाग.2 च्या विद्यार्थ्यांने आंतर महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावरील के. जी. सोम्मया कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्स, मुंबई यांचे मार्फत आयोजित LIFE UNIVEILED (PG) आणि THE LAUGHING BIOME EVENT मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यासाठी त्याला कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू, प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील व अधिविभागप्रमुख प्रा. कैलास सोनवणे, डॉ. पद्मा दांडगे, विभागीय समन्वयक, विद्यार्थी विकास., प्रा.ज्योती जाधव, डॉ. प्रदीप गुरव, डॉ.पंकज पवार,
डॉ. संदीप काळे या प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.