+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule19 Sep 24 person by visibility 133 categoryशैक्षणिक
▪️घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि शॉर्ट-टर्म कोर्सेस "प्रारंभ २०२४" कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि एमएसबीटीई मान्यताप्राप्त शॉर्ट-टर्म अभ्यासक्रमाचा “प्रारंभ २०२४” कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट व्ही. गिरी, प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल थिकने, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेसचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे, डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख, डिप्लोमा इंजीनियरिंगचे विभाग प्रमुख,कार्यक्रम समन्वयक प्रा. विनायक पावटे, प्रा.सौ. रजनी अतिग्रे, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्निल थिकने यांनी केले. डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे सूत्र आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी या विषयी मार्गदर्शन करून संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतल्याबद्दल पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले म्हणाले इंजिनिअरिंग क्षेत्राची निवड केलेली असून त्यामध्ये सक्सेस मिळवून इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या नवीन संकल्पनांना आत्मसात करून त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या सोबत असून जागतिक लेव्हलचे मार्गदर्शन मिळवून देण्याचे प्रयत्न इन्स्टिट्यूट मध्ये नेहमीच केले जात आहेत. निवडलेल्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळविण्याची विविध उदाहरणे भोसले यांनी विद्यार्थी व पालकांसमोर मांडली. सिईटी परीक्षेमध्ये विशेष गुण मिळवलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहम तिवडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. विनायक पावटे यांनी मानले. "प्रारंभ २०२४" कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.