+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule19 Sep 24 person by visibility 222 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारतासाठी स्वयं प्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी 2017 पासून प्रत्येक वर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जातो. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्यावतीने दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2024 यादरम्यान स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. 

यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2024 पासून शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करणे, निर्माल्य संकलन, निर्माल्य वर्गीकरण व त्यापासून कंपोस्ट खताची मोहीम शहरातील सर्व एनजीओ यांना सहभागी करून राबविण्यात येत आहे. गणेश उत्सव 2024 अंतर्गत या मोहिमेमध्ये सर्वांच्या विविध सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दि.2 ऑक्टोबर 2024 पर्यंत इतर विविध कार्यक्रमांचे आयोजनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर शहरातून प्रति दिवस 290 टन कचरा संकलित केला जातो. त्यावर कसबा बावडा कचरा प्रक्रिया प्रकल्प समूह येथे प्रक्रिया केली जाते. 290 टन कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेकडे 174 टिप्पर वाहने आहेत. ही टिप्पर वाहने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करतात. शहरात 1 लाख 60 हजार इतक्या घरामधून कचरा संकलन केला जातो. याघरांमधून कचरा संकलित करताना प्रत्येक टिप्परला प्रतिदिन सरासरी 900 घरांच्या मधून कचरा संकलित करावा लागतो. यासाठी सकाळी 6.00 ते 2.00 आणि दुपारी 2.00 ते रात्री 10.00 अशा दोन शिफ्ट मध्ये कचरा संकलन करण्याची प्रक्रिया राबवली जाते.

कचरा संकलित केल्यानंतर कसबा बावडा कचरा प्रक्रिया प्रकल्पावर हा कचरा विविध प्रकल्पांच्या मशिनरींच्या माध्यमातून प्रक्रिया करताना या ठिकाणी कार्यरत असणारे 200 कर्मचारी सकाळी 6 ते 2 आणि दुपारी 2 ते 10 अशा दोन शिफ्टमध्ये अहोरात्र मेहनत करून काम करतात. या कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी स्वच्छता ही सेवा 2024 अभियानाची सुरुवात कसबा बावडा कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून करण्यात आली आहे. या प्रक्रिया केंद्रामधून 150 टन आरडीएफ प्रकल्प, 53 टन विंड्रो कंपोस्ट खत प्रक्रिया प्रकल्प, स्लरी प्रकल्प, हॉर्टिकल्चर प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, 75 केएलडी लिचड प्रक्रिया प्रकल्प, एस.टी पी प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प असे 8 प्रकल्प कार्यान्वित आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील घनकचरा बायोमेडिकल वेस्ट व ड्रेनेज वॉटरवर प्रक्रिया राबवली जात आहे.