+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule19 Sep 24 person by visibility 100 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये देखील आव्हान पेलणारा सक्षम अभियंता बनविण्यासाठी डीकेटीई नेहमी अग्रेसर राहील, जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे आणि असे सक्षम व गुणवत्तापूर्ण अभियंता बनविण्याचे सामर्थ्य डीकटीईमध्येच आहे असे प्रतिपादन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल व इंजिनिअरींग, डिप्लोमा व एमबीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले.

प्रथम वर्षाचा विद्यार्थी हा विविध भागातून तसेच विविध पार्श्‍वभूमी मधून आणि जिज्ञासू वृत्तीने येत असतात त्यांना नविन वातावरणात जुळवूण घेण्यास मदत करणे व त्यांच्यामध्ये संस्थेबददल आपुलकी निर्माण करणे हे महत्वाचे असते हाच या स्वागतसमारंभाचा मुख्य हेतू आहे. घोरपडे नाटयगृह, इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या या समारंभात डॉ. सपना आवाडे यांनी, डीकेटीई इन्स्टिटयूट ही जगभरात आदर्शवत इन्स्टिटयूट म्हणून ओळखली जाते असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक मंत्र सांगितले हे सांगत असताना इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी देशहीत तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, नियमित व्यायाम व नियमित वाचनाचा सराव करावा अशा अनेक मुलभूत गोष्टी डॉ सपना आवाडे यांनी नवीन विद्यार्थ्यांना सांगितल्या. डीकेटीईतील गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञान अवगत करुन अभियांत्रिकी शिक्षणातील यश संपन्न करावे व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाने डीकेटीईचा असाच नावलौकीक वाढवावा असे सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

संचालिका प्रा.डॉ. एल.एस.आडमुठे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच जगभरातील विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्यामध्ये डीकेटीई ही संस्था देशात आघडीवर आहे. वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी या दोन्ही शिक्षण क्षेत्रात संशोधनामध्येही या संस्थेने जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्या आपल्या उद्योगात डीकेटीई मधील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास इच्छुक असतात. विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण मोठया शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असते. यावरुन संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण अधोरेखित होते असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली. प्रा. एस.ए. पाटील यांनी ‘सॉग ऑफ युथ‘ हे सर्वाना सांगितले. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी प्राध्यपकांशी समन्वय साधत आपले अभ्यासक्रमातील अधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी मार्गदर्शन केले. डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबददल माहिती सांगितली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रा.एस.बी.अकिवाटे यांनी गतवर्षी उच्च पॅकेजवरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे उल्लेखली. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या, प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मानद सचिव डॉ. सपना आवाडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रा.आर.के.वळसंग यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. प्रतिमा चौगुले यांनी केले. वंदे मातरम प्रा. शिवतेज पाटील यांनी गायले.

 कार्यक्रमास सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, टेक्स्टाईल व इंजिनिअरींग टीपीओ, ऑफीस प्रमुख, क्रिडाप्रमुख, लायब्ररी प्रमुख आदींची उपस्थिती होती.