+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule19 Sep 24 person by visibility 187 categoryराज्य
🟠शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन
🟠 रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन
🟠 पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार

कोल्हापूर : भारतामध्ये 2020 साली नवे शैक्षणिक धोरण आले, देशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. एकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व शासकीय तंत्रनिकेतन येथील रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुलांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर बेरोजगारी वाढेल. महाविद्यालयात वेगवेगळी तांत्रिक उपकरणे, मॉडेल सादर करून प्रदर्शने भरवा, यासाठी सीएसआरची मदत घ्या, जगभरातून वेगवेगळे शिक्षक बोलवा, चांगले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा यातून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होवून मुलांना जगाच्या पाठीवर उभे राहण्यासाठी आधुनिक शिक्षण मिळेल.

या उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध देशांबरोबर भारत सरकार, महाराष्ट्र राज्य यांच्यात कौशल्य आधारीत मनुष्यबळ मिळण्यासाठी विविध करार झाले आहेत. जगाच्या पाठीवर भारतींयासाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकरीता आपल्याला विदेशातील नोकऱ्यांसाठी अर्ज करावा लागेल. या प्रक्रियेत शासन मदत करणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, महिलांना रोजगार वाढावा म्हणून आता चार तासांचे काम याबाबत विचार करायला हवा. महिलांना आपले घर सांभाळून काम करता यावे यासाठी आणि त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी अशा धोरणाची गरज आहे. राज्य शासनही याबाबत धोरण आणण्याचा विचार करीत आहे. पुण्यात लवकरच 100 महिलांना या पद्धतीने काम देणे सुरू करणार आहे. कौशल्यावर आधारीत मनुष्यबळ निर्मितीसाठी तसे अभ्यासक्रम निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आसपासच्या उद्योगांमध्ये कशाची आवश्यकता आहे याचा अभ्यास करा. यामुळे स्थानिक उद्योगांमध्ये काय गरज आहे आणि आपण कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत हे कळेल. कोल्हापूर जिल्हयात पुढिल शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले जिल्हयात शासकीय फार्मसी कॉलेज नाही. लोकांची मागणी पुर्ण करून फार्मसी कॉलेज याच जागेत सुरू करु किंवा जिल्हाधिकारी यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देतील.

खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिले. ते यावेळी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणामुळे वाढत्या उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ कोल्हापूर मधून मिळेल. कोल्हापूर जिल्हयातील उद्यमनगर ते पंचतारांकित एमआयडीसी मधील व्यावसायिकांबरोबर विद्यार्थ्यांनी संवाद साधून कौशल्यात भर टाकावी.

 प्रास्ताविकात संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीची, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाची उपस्थितांना माहिती दिली.

🟠 अशा प्रकारे मिळणार नवीन सुविधा -
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या माध्यामातून शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे दोन उत्कृष्टता केंद्रे व एक बहुउद्देशिय केंद्र

१. बहुउद्देशिय संगणक केंद्र (Multi Purpose Computer Centre) - या केंद्रामध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सॉफ्टवेअर व ऑनलाईन संशोधनांसह डिजीटल क्लासरुमची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने ४२ संगणक, लॅपटॉप, हायस्पीड इंटरनेट सुविधा, दोन हायएंड सर्व्हर, फायर वॉल, प्रिंटर, एल.ई.डी. टि.व्ही. ई.पी.बी.एक्स. प्रणाली, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम अशी संपूर्ण यंत्रणा ही सी.सी.टि.व्ही. निरीक्षणाखाली कार्यान्वयीत करणेत आली आहे.

२. रोबोटिक आणि ऑटोमेशन उकृष्टता केंद्र (Centre for Excellence in Robotics and Automation) - अत्याधुनिक सोयीसुविधांचा वापर करुन अत्याधुनिक पध्दतीची रोबोटिक आणि ऑटोमेशन सुविधा असलेले केंद्र प्रस्थापित करण्यांत आले असून या केंद्रामध्ये चार रोबोट द्वारे सुमारे वीस प्रकारची विविध कामे करता येतात. या केंद्रामध्ये संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी २४० तासांचे मोफत प्रशिक्षण देण्यांत येणार असून संस्थेबाहेरील विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ति व इतरांसाठी सशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यांत आली आहे. या केंद्राच्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व औद्योगिक क्षेत्रांना प्रशिक्षीत तज्ञ उपलब्ध होतील.

३. इंटरनेट ऑफ थिंग्ज उत्कृष्टता केंद्र (Centre for Excellence in loT) - या केंद्रामध्ये विविध Sensors, Actuators, 3D Printer, IoT Gatway, अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स, क्लाऊड कॉम्प्युटींग प्लॅटफॉर्म, इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनल अशी विविध औद्योगिक क्षेत्रांना लागणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रणालीची उभारणी करण्यांत आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, स्वयंचलित यंत्रणा, आरोग्य या क्षेत्रांच्या तंत्रज्ञान प्रणालीचा समावेश करण्यांत आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्यपूर्ण करियरच्या संधी, त्यांचा कौशल्य विकास घडविण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यांत येणार आहे. तसेच विविध उद्योग समुहांना मुख्यत्वे शेती व फाँड्री उद्योगाला लागणारे तांत्रिक व कुशल तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यांत येणार आहे.

४.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेच्या नूतन वास्तूबाबत - या महाविद्यालयात तांत्रिक क्षेत्रातील मागणीनुसार एकूण ३०० प्रवेश क्षमतेच्या पाच विद्याशाखा आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरींग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि मेकॅनिकल अॅड ऑटोमेशन इंजिनीअरींग यांचा समावेश आहे.

  महाविद्यालयाकरिता १० एकर परिसरामध्ये एकूण पाच इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन आज होत आहे याकरिता सुमारे रु. १७५ कोटी इतका निधी महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्य शैक्षणिक व प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ३४ प्रयोगशाळा, १४ वर्गखोल्या, ३ सभागृहे आणि २ कर्मशाळा असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी प्रत्येकी ३०० विद्यार्थी व ३०० विद्यार्थीनी क्षमतेची; दोन स्वतंत्र अकरा मजली इमारतीमध्ये वसतिगृहे असून त्यामध्ये एका खोलीत दोन विद्यार्थी व त्यांचेसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक कैफेटेरिया आणि मेस इमारत तसेच प्राचार्यांचे निवासस्थान देखील उभारण्यात येत आहे.