SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठागांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशाराप्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूलराधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखालीडेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजनाडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026

जाहिरात

 

गांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षा

schedule12 Aug 26 person by visibility 104 categoryराज्य

कोल्हापूर: गांधीनगर (कोल्हापूर) येथील कोयना कॉलनी परिसरात पासपोर्ट किंवा वैध पारपत्राशिवाय बेकायदेशीरपणे घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रं. २) मा.  आर. व्ही. उत्पात यांच्यासमोर लागला.

दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी गांधीनगर पोलिसांनी कोयना कॉलनी येथील शशिकांत इंगवले यांच्या भाड्याच्या घरात छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान सोहेल कलाम मुल्ला (वय ३३, रा. जिकरगाछा, जि. जोशुर, बांगलादेश) आणि सुमैय्या बादशाह मुल्ला (वय २६, रा. बडदे महाजन, जि. नोदाई, बांगलादेश) हे दोघे भारत देशात कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय घुसखोरी करून राहत असल्याचे निष्पन्न झाले.

या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले ८ साक्षीदार आणि सरकारी वकील ॲड. प्रतिभा जे. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपींना विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ आणि पारपत्र अधिनियम १९५० अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी ३ वर्षे ८ महिने सक्त कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी १०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावासाची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. प्रतिभा जे. जाधव यांनी काम पाहिले, तर त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल एफ. आय. पिरजादे आणि पी. आर. पाटील यांनी मदत केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes