SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशाराप्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूलराधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखालीडेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजनाडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..

जाहिरात

 

विद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष

schedule12 Aug 26 person by visibility 96 categoryराज्य

कोल्हापूर : प्रसारमाध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करियरच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांना करियरसाठी प्रसार माध्यमे महत्वाची आहेत. असे प्रतिपादन आर. जे. मनीष आपटे यांनी केले.

 शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्ताने "प्रसार माध्यमातून करियर संधी " या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ.पी.एस.पाटणकर होत्या.यावेळी उपकुलसचिव  विनय शिंदे, सहा.कुलसचिव श्री. दिलीप मोहाडीकर,सहा.प्राध्यापक ,समन्वयक व विद्यार्थी उपस्थित होते.यांनी केले.

 आर. जे. मनीष म्हणाले की, प्रिंट मीडिया, इलेट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी आहेत.त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे महत्वाचे आहे.लेखन कौशल्य महत्वाचे आहे.त्यासाठी कायम उपडेट असणे आवश्यक आहे. प्रिंट मीडियातून अनुवादक म्हणून आजच्या काळात संधी उपलब्ध झाल्या आहेत.

 त्याचबरोबर संवाद कौशल्य,विषयांचे ज्ञान,शारीरिक फिटनेस महत्वाचा आहे. प्रत्येक वयोगटातील प्रत्येक जन प्रसार माध्यमामध्ये काम करू शकतो.तसेच डिजिटल माध्यमातून सध्या विविध करियरच्या संधी उपलब्ध होत आहेत.असे आर.जे.मनीष यांनी केले.

  डॉ. पाटणकर म्हणाल्या की,प्रसार माध्यम मध्ये करिअर करण्यासाठी भाषाकौशल्य, लेखन कौशल्य, तंत्रज्ञान कौशल्य, आत्मविश्वास, सतत शिकण्याची वृत्ती आत्मसात करणे आवश्यक आहे.त्याच बरोबर प्रसार माध्यमातून रिपोर्टर,कन्टेट रायटर, कन्टेट एडिटर.एडिटर इ.संधी उपलब्ध आहेत.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक सहा.प्राध्यापक डॉ.संजय चोपडे यांनी केले.पाहुण्याची ओळख कोर्स कॉर्डीनेटर डॉ.नगीना माळी यांनी करून दिली.सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले. तर समन्वयक नवनाथ चव्हाण यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes