SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठागांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशाराप्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूलराधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखालीडेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजनाडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026

जाहिरात

 

काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठा

schedule12 Aug 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत थेट पाईपलाईन योजनेतून पाणी उपसा नियमित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेला एक दिवस आड पाणी पुरवठा बंद करून गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून शहरासह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. नदीपात्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार क्लोरिन व अँलमचे योग्य प्रमाणात डोस देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.

  तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. तसेच दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes