SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : 27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभ

schedule02 Jun 26 person by visibility 387 categoryगुन्हे

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते  30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास महापालिका करामध्ये 6 टक्के सूट जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील 27 हजार 756 मिळकतधारकांनी या 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. यामधून 12 कोटी 11 लाख 60 हजार 949 रुपये रक्कम जमा झाली आहे. 

शहरातील 1,41,526 मिळक्तधारकांनी अद्यापही सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम जमा केलेली नाही.

 महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9:00 ते दुपारी 4:30 या वेळेत सुरु ठेवण्यात आलेली आहेत. तसेच नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्रामधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी 30 जून 2026 अखेर आपली सन 2026-27 चालू आर्थिक वर्षाची घरफाळ्याची रक्कम भरुन महापालिका करामधील 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes