SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

महाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्तः ३८,८०० चा मुद्देमाल जप्त; पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाई

schedule02 Jun 26 person by visibility 354 categoryगुन्हे

कोल्हापूर : शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजी पेठ, महाकाली मंदिर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जिल्हा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या पथकाने 1 जून रोजी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत गॅस भरण्याच्या मोटारी, सिलिंडर्स आणि डिजिटल क्यूआर कोडसह सुमारे 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१ जून रोजी महाकाली मंदिर परिसरात एका ऑटो रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात तयार करून घटनास्थळी धाड टाकली.

पथकाने तात्काळ बाजूलाच असलेल्या एका कौलारू घराची झाडाझडती घेतली असता, तिथे हे बेकायदेशीर आणि जीवघेणे रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले. घटनास्थळावरून राजेंद्र चंद्रकांत मस्के (वय ४८, रा. लक्षतीर्थ वसाहत) आणि स्वप्निल शिंदे (वय १८ वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले असून, विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS 2023) कलम २८७ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा (१९५५) कलम ३ व ७ अन्वये कडक कायदेशीर गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे.

🟣  कोल्हापूर जिल्हा आणि शहरात कुठेही अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग, काळाबाजार किंवा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी सुरू असेल, तर पुरवठा विभाग त्यावर यापुढेही अशीच कठोर आणि दंडात्मक कारवाई करेल. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला देऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.

या छाप्यात गॅस माफियांकडून ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञानही जप्त करण्यात आले आहे. तसेच २ HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारीः २ नग (किंमत रु. २०,०००), HPCL गॅस सिलिंडर्सः ३ रिकामे व २ भरलेले (किंमत रु. ११,५००), तोशिबा इलेक्ट्रिक वजनकाटा व वजनमापः किंमत रु. ५,२००,
डिजिटल पेमेंट साहित्य (Paytm स्कॅनर व QR कोड बोर्ड): किंमत रु. ६००, नोझल, पाईप आणि ५ मीटर केबल बोर्डः किंमत रु. १,५०० असे एकूण जप्त किंमतः ३८,८००/- रुपये

पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नम्रता कुडाळकर, तुषार पाटील, अभिजित खोत, लिपिक विपुल पाटील, जयवंत गोते, सुशीलकुमार खोंद्रे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes