SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी संयुक्त कृती आराखडा राबविणार

schedule02 Jun 26 person by visibility 314 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी महानगरपालिका व शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक समंस्यावर उपाययोजनांसाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. हि बैठक  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर ट्रॅफिक साईन बोर्ड, थर्मोप्लास्टिक रस्ता चिन्हांकन (पट्टे) आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच मंजूर आकृतीबंधानुसार महानगरपालिकेचा स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित करून त्यामध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

विशेषतः श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे दूर करणे, मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालणे, तसेच आवश्यकतेनुसार एकेरी मार्ग, नो-पार्किंग व नो-एन्ट्रीसारख्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) वाहनतळांची क्षमता वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर वाहतूक शिस्तीबाबत प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जाणार आहे.

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांवर कारवाई करणे, तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार आहे.

महासभेच्या धोरणानुसार लोकसहभाग व सामाजिक बांधिलकी (CSR) अंतर्गत रोड डिव्हायडर स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण, नियोजित पार्किंग पट्टे, ट्रॅफिक साईन बोर्ड उभारणी तसेच नव्या ट्रॅफिक आयलंडची निर्मिती यांसारखी कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.

अतिक्रमण व फेरीवाला हटाव कारवाईदरम्यान कोल्हापूर पोलीस दलामार्फत महानगरपालिकेस आवश्यक पोलीस बंदोबस्त विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतही समन्वय ठेवण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक आप्पासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, शाखा अभियंता सुरेश पाटील, विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes