SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

महिला व बाल कल्याणच्या योजनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे आवाहन

schedule16 Sep 25 person by visibility 322 categoryराज्य

कोल्हापूर : महिला व बाल कल्याण विभागाकरीता सन 2025-26 साठी जि. प. स्वनिधीमधून प्राप्त झालेल्या 10 टक्के तरतुदीनुसार ग्रामीण भागातील मुली व महिलांकरीता विविध योजना निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी अर्जाचा नमुना विनामुल्य गट स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), सर्व पंचायत समिती कार्यालयामार्फत वाटप करण्यात येणार असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनांचे अर्ज सादर करावेत .

योजना पुढीलप्रमाणे आहेत - अनाथ / एकल पालक इ.1 ली ते 10 वी मधील मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरविणे, तारांगणा क्रीडा, कला व शिक्षण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या ग्रामीण भागातील 18 वर्षाच्या आतील मुलांचा / मुलींचा सत्कार करणे, सर्वसाधारण घटकातील इ. 7 वी ते 12 वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान देणे, सर्वसाधारण घटकातील इ. 5 वी ते 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरविणे,  ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील महिलांना पिठाची गिरण खरेदी करीता अनुदान पुरविणे, अनुसूचित जाती घटकातील इ. 5 वी ते 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरविणे तसेच ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील महिलांना छोटे किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य पुरविणे आदी योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी अर्ज करावेत असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes