माजी आमदार जयश्री जाधव यांची पुत्र सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत प्रचार फेरी
schedule08 Jan 26 person by visibility 186 categoryराजकीय
कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव याचे पुत्र सत्यजित चंद्रकांत जाधव हे प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या प्रचारार्थ जयश्री जाधव यांनी महिला मतदार व कार्यकर्त्यां सोबत मंगळवार पेठ कैलासगड स्वारी मंदिर- साठमारी - बेलबाग परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्तेची जाधव यांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी सकाळी मंगळवार पेठ, कैलासगड स्वारी मंदिर- साठमारी - बेलबाग परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी कोण आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला, निवडून द्या निवडून द्या धनुष्यबाण निवडून द्या, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
दरम्यान माजी आमदार जयश्री जाधव यांनी मतदारांशी आपुलकीने संवाद साधत पुत्र सत्यजित जाधव यांना विजय करण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

