कोल्हापूर: जमिनीच्या वादातून झालेल्या खुनातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक
schedule08 May 26 person by visibility 120 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कोनोली येथे जमिनीच्या वाटणीवरून झालेल्या वादात सुरज पांडुरंग फाले यांची हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बापू धोंडीराम फाले (वय २१) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शिताफीने अटक केली आहे.
२ मे २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यात पाच जणांनी मिळून सुरज फाले यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यातील आरोपी बापू फाले हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शोध घेत असताना, पोलीस अंमलदार शुभम संकपाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोल्हापूर येथील रिंग रोड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून, पुढील तपासासाठी आरोपीला राधानगरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.